ंंसींपीयाचे कुळीं जन्म माझा जाला |
पिर हेतु गुंतला सदाशीवीं || १ ||
रात्रीमाजीं सीवी दीवासामाजी सीवी |
आराणूक जीवीं नोव्हे कदा || २||
सुई आणी सुतळी कात्री गज दोरा |
मांडीला पसरा सदशीवीं ||३||
नामा म्हणे सीवीं वीठोबाची अंगीं |
म्हणोनीयां जगीं धन्य जालों || ४||